राजकिय

पश्चिम महाराष्ट्र प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल बसवराज पाटील यांचा सत्कार

लोहारा (जि. धाराशिव): माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांची काँग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या प्रभारीपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल लोहारा येथील काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुरूम येथील विठ्ठल साई काखानामध्ये बसवराज पाटील यांचा सत्कार केला. आगामी लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुका कुठल्याही परिस्थित जिकण्याच्या इर्षेने काँग्रेस पक्ष निवडणुकीत उतरणार आहे. त्या अनुषंगाने काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाने प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्याबद्दल लोहारा शहरातील काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बसवराज पाटील यांचा सत्कार केला. यावेळी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष दीपक मुळे, लोहारा काँग्रेसचे शहराध्यक्ष अयनोद्दीन सवार, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा सचिव रौफ बागवान, युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, माजी शहराध्यक्ष के. डी. पाटील, नगसेवक प्रशांत काळे, बापू जट्टे, ओम पाटील, संतोष फावडे, सिराज सिद्दकी, अंकुश नारायणकर, अमित विरोधे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close