कबड्डी स्पर्धेत नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचा दबदबा

लोहारा (जि. धाराशिव): शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील मुलांच्या व मुलींच्या कबड्डी संघाने लोहारा तालुक्याचे विजेतेपद मिळविले आहे. जिल्हास्तरावरील कबड्डी स्पर्धेसाठी या दोन्ही संघाचे निवड झाली आहे. विजेत्या संघचा सत्कार महाविद्यालयात करण्यात आला. लोहारा तालुका क्रीडा संयोजन समिती, जिल्हा क्रीडाधिकारी क्रीडा व युवक संचालनालयाच्या वतीने तालुक्यातील होळी येथील भीमराव नाईक विद्यालयात कबड्डी स्पर्धा पार पडल्या. कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेताजी सुभाषचंद्रबोस महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या संघाचा पराभव केला. मुलाच्या संघाने माकणी येथील भारत महाविद्यालयाच्या संघाचा पराभव केला. मुलीच्या संघात सुहानी गोरे, दिव्या श्रीगिरे, आरती मोरे, प्रांजली क्षीरसागर, पल्लवी रवळे, नम्रता चव्हाण, ऋतुजा शिंदे, मेहेक इनामदार, गीता सूर्यवंशी, प्राची गरड, श्वेता देवकर, प्रतीक्षा भोसले तर मुलांच्या संघात कर्णधार प्रणव रोडगे, धम्मदीप कांबळे, सोहेल सय्यद, आसिफ माणियार, वैभव होंडराव, संघदीप कांबळे, प्रथमेश गिरी, समर्थ वैरागकर, समर्थ बिराजदार, अभिजित क्षीरसागर, कृष्णाथ शिंदे, समाधान लोखंडे यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. विजेत्या खेळाडूंचा सत्कार संस्थेचे सचिव, प्राचार्य डॉ शेषेराव जावळे-पाटील यांनी केला. यावेळी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या प्राचार्या उर्मिला पाटील, क्रीडा विभागप्रमुख प्रा. प्रशांत काळे, नागनाथ पांढरे, भास्कर जाधव, संघ व्यवस्थापक सचिन शिंदे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, राजेशा आष्टेकर, राजेंद्र साळुंके, सुनील बहिरे, दत्ता जावळे, काकासाहेब आनंदगावकर, अंकुश शिंदे, सुलोचना रसाळ, बालाजी सूर्यवंशी, ज्ञानदेव शिंदे, नारायण आनंदगावकर, श्रीकांत मोरे, संजय जगताप, विठ्ठल कुन्हाळे, विजय उंबरे, मुकुंद रसाळ, विद्यासागर गिरी, रामचंद्र खुणे, दिलीप जाधव, पौर्णिमा घोडके, विष्णुदास कलमे उपस्थित होते.





