सामाजिक
उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

लोहारा (जि. धाराशिव): माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तथा शिवसेना पक्षप्रमुख यांचा वाढदिवस लोहारा तालुक्यात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून अशोकराजे सरवदे यांच्या वतीने सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयातील ररग्णांना फळे वाटप केली. तसेच निवासी दिव्यांग शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आला. यावेळी स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प व्यवस्थापक रमाकांत जोशी, केशव सरवदे, मारुती जाधव, बंकट माळी, नितीन सरवदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.





