पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे शांततेचे आवाहन

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील सकल मराठा बांधवांना पोलिस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते की, धाराशिव जिल्हा हा शांतता प्रिय असून, याची शांतता भंग होता कामा नये. करिता आपण सर्व मराठा बांधवांनी शांततेचा मार्ग अवलंबवावा, पोलिस प्रशासन सदैव आपल्या सोबत आहे. आपल्याकडून आज धाराशिव जिल्हा बंद आवाहनामध्ये कुठल्याही प्रकारची शासकीय अथवा खाजगी मालमत्तेचे , जीवित अथवा वित्त हानी होता कामा नये. याची सकल मराठा बांधवांनी दखल घ्यावी व आपला जिल्हा शांतता प्रिय आहे. हे सर्वांना दाखवून द्यावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे
अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोनकर्त्यांना अमानुष लाठीचार्ज केला. यात महिलासह नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने धाराशिव आज शनिवारी जिल्हा बंदचे आयोजन केले आहे. या जिल्हाबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्ष अतुल कुलकर्णी यांनी नागरिक, कार्यकर्त्यांना शांततेच आवाहन केले आहे.

