ईतर

पैगंबर जयंतीनिमित्त लोहारा शहरात मिरवणूक, लहान मुलांचा सहभाग मोठा

लोहारा (जि. धाराशिव) हजरत महम्मद पैगंबर याच्या जन्मदिनानिमित्त शनिवारी (ता. ३०) सायंकाळी शहरातून मिरवणूक काढून ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मिरवणुकीमध्ये लहान मुलांचा सहभाग मोठा होता.
महम्मद पैगंबर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बागवान समाज, कुरेशी समाज यांच्यासह विविध संघटनांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिठाई, शिऱ्याचे वाटप करण्यात आले. महंमद फकीर यांनी अन्नदान केले. पैगंबर जयंतीनिमित्त शहरातील महेबूब सुभहानी दर्गापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौक, जगदंबा मंदिर मार्गावरील ईदगाह मस्जिद या ठिकाणी धार्मिक विधीनुसार मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी नाते शरीफ यांचे पठण करण्यात आले. यावेळी शहा हुसेन कादरी, हापीस शमशुद्दीन, उस्मान सिद्धकी, जामा मस्जिदचे हैदर शेख, मैनुद्दीन ईमाम, गणी पेशईमाम, मैनुद्दीन पेशइमाम, बाबा शेख, नगरसेवक अमीन सुंबेकर, शमशुद्दीन भोंगळे, नगरसेवक आरिफ खानापुरे, आयुब अब्दुल शेख अमीन कुरेशी, दादा मुल्ला, शमशुद्दीन भोंगळे, जहीर खुटेपड, शब्बीर गवंडी, नासीर शेख, जावेद शेख, इस्माईल मुल्ला, वजीर मणियार, खालीद पटेल, मोईन शेख, अल्ताफ शेख, सलमान शेख, इशराक शेख, अहेमद शेख, समीर पठाण, शाहरुख गवंडी, अमन पठाण, इमरान भोंगळे अय्याज सवार इनुस ठाणेदार आदी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close