ईतर

एनसीसी दिनानिमित्त उमरगा येथे रक्तदान शिबिर

मुरूम (जि. धाराशिव): श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे एनसीसी, एनएसएस , एचडीएफसी बँक, श्रीकृष्ण रक्तपेढी, अश्लेष भैया मोरे मित्रमंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान केल्यामुळे हृदयरोग, कँसर, मधुमेह , रक्तदाब यासारखे रोग होण्याचा धोका कमी होतो. रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे. प्रत्येक व्यक्तिने रक्तदान करून एखाद्या गरजवंतास जीवदान देऊ शकता यासाठी अनेक सामाजिकसंस्था, महाविद्यालयाने असे कार्यक्रम घेऊन व्यक्तिचे प्राण वाचवावे असे आवाहन डॉ. अस्वले यांनी केले. शिबिरामध्ये एकूण ४६ जनांणी रक्तदान केले . कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एचडीएफसी बँकेचे मॅनेजर आशिष बिराजदार, भीमाशंकर तोडकरी , उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, डॉ. पद्माकर पिटले, प्रा. गुंडाबापू मोरे, अमित मोकाशे, विजय केवडकर उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. गिरीधर सोमवंशी यांनी केले तर कॅप्टन डॉ. ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close