राजकिय

दक्षिण जेवळी ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक तर माकणी, कास्ती, राजेगाव, बेंडकाळ या गावांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

लोहारा (जि. धाराशिव): तालुक्यातील दक्षिण जेवळी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. त्याचबरोबर तालुक्यातील माकणी, कास्ती (बुद्रुक), बेंडकाळ, राजेगाव या चार ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ता. १६ आक्टोंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करणास सुरवात होणार आहे. २० तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील, २३ तारखेला उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. २५ तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. पाच नोव्हेबरला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. सहा नोव्हेंबरला मतमोजणी तहसील कार्यालयात होणार आहे. मुदत संपणाऱ्या दक्षिण जेवळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबरोबरच तालुक्यातील रिक्त असलेल्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. वर्ष ते सहा महिन्यांपासून विविध कारणामुळे तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्याच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. यात माकणी ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोनमधील अनुसूचित जाती महिलेसाठी राखवी असलेली एक जागा, कास्ती बुद्रुक ग्रामपंचायतीच्या प्रभाग एकमधील अनुसूचित जाती महिलेसाठी राखवी असलेली एक जागा, राजेगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग तीनमधील सर्वसाधरण महिलेसाठी राखीव असलेली एक जागा तर बेंडकाळ येथील प्रभाग दोनमधील सर्वसाधार महिलेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने राजकीय पुढाऱ्यांमध्ये खलबते सुरू झाले आहेत. इच्छुकांनी निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण मात्र तापू लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close