राज्य

बोधिसत्व बचत गटाकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

वार्षिक सर्वसाधारण सभेत झाला गौरव

उमरगा (जि. धाराशिव): येथील बोधिसत्व बचत गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी बोधिसत्व बचत गटाकडून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा शाल, मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला उमरगा शहरात आंबेडकरी विचाराने भारावलेल्या सजग नागरिकांनी १ जानेवारी २०१७ रोजी बोधिसत्व बचत गट सुरू केला. पाहता-पाहता बचत गटाची उलाढाल ४० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. गरजवंतांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना उर्जितावस्थेत आणण्यासाठी बचत गटाकडून सातत्याने प्रयत्न केला जातो. शिवाय बचत गटाने नेहमीच समाज उपयोगी, विधायक उपक्रमाला प्राधान्य दिले आहे. आंबेडकरी चळवळीला बळ देण्याचा प्रयत्न असतो. मंगळवारी (ता. १७) उमरगा शहरातील कैलास शिंदे मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या बोधिसत्व बचत गटाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध क्षेत्रातीलील मान्यवरांचा पुरस्कार गौरव सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड होते. यावेळी माजी समाज कल्याण सभापती हरीश डावरे, माजी जिल्हा परिषद सदस्य एस. के. चेले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव, माजी गटविकास अधिकारी मच्छिंद्र सरपे, माजी सरपंच राम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड बोलताना म्हणाले की, पैशाची बचत म्हणजे पैशाची मिळकतच होय. बचत करण्यासाठी नियोजनबद्घ आणि हेतूपुरस्सर प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसा प्रयत्न जर झाला नाही, तर वर्तमानकाळात त्या व्यक्तीस मिळणारे सर्वच उत्पन्न खर्च केले जात असेल तर पैशाची बचत होणार नाही. त्यामुळे अडचणीच्या प्रसंगी सुरक्षितपणे उभे राहण्यासाठी समाजामध्ये आर्थिक साक्षरता आणि बचत करण्याची सवय वाढवणे गरजेचे आहे. तसेच समाजातील विषमता कमी करण्यासाठी आर्थिक व ज्वलंत प्रश्नावर आधारित सामाजिक चळवळी उभ्या राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोधिसत्व बचत गटाचे अध्यक्ष सुभाष काळे, सचिव बालाजी गायकवाड, दिग्विजय शिंदे,  नागनाथ गायकवाड, राहुल कांबळे, तानाजी कांबळे, दिगंबर गायकवाड, संतोष सुरवसे, दयानंद बेळंबकर, दत्तात्रय सोनकांबळे, बाबासाहेब जाधव, संजीव कांबळे, विकास कांबळे, मनोज गायकवाड, बालाजी सुरवसे, राहुल सरपे, प्रशांत गायकवाड, रमेश जकाते, अश्वजीत माकणीकर, सुभाष कांबळे, अशोक गायकवाड, बलराज हिप्परगे आदी उपस्थित होते.

यांचा झाला सन्मान

प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड, हरीश डावरे, एस.के.चेले, कैलास शिंदे, दिलीप भालेराव, मच्छिंद्र सरपे, राम गायकवाड, अॅड. मल्हारी बनसोडे, अॅड. हिराजी पांढरे, पत्रकार नीळकंठ कांबळे, समीर सुतके,  गो. ल. कांबळे यांना शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close