ईतर

जन्म व मृत्यूच्या नोंदीची पडताळणी करून प्रमाणपत्र द्या: स्वराज्य पक्षाची मागणी

लोहारा (जि. धाराशिव): जन्म व मृत्यू याची नोंदणी करण्याचे अधिकार शासनाने तहसील प्रशासन तसेच उपविभागीय अधिकारी यांना दिले आहेत मात्र वरिष्ठांची परवानगी नसल्यामुळे व पडताळणी करण्यासाठी कुठले कागदपत्रे तपासायचे हे माहिती नसल्यामुळे तहसील कार्यालय जन्म व मृत्यू याची पडताळणी करून प्रमाणपत्र देत नसल्यामुळे लोहारा तालुक्यातील अनेक गावात नागरिकांच्या नजरचुकीने व माहिती अभावी नोंदणी करण्याचे राहून गेलेल्या नागरिकांच्या पाल्यांचे शैक्षणिक व इतर कामासाठी लागणारी विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .याबाबत स्वराज्य पक्षातर्फे लोहारा तहसीलदार यांना प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे निवेदनामध्ये म्हटले, की नागरिकांच्या माहिती अभावी किंवा चुकीने नोंदणी करण्याचे राहून गेल्यास मोठ्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे शैक्षणिक किंवा इतर कामासाठी लागणारी विविध प्रकरणाचे दाखले मिळवण्यासाठी या नोंदणीची आवश्यकता भासत असून सर्व पुरावे तपासून नागरिकांना शासन निर्णयानुसार तहसील कार्यालय लोहारा या ठिकाणी जन्म व मृत्यूची प्रमाणपत्र देण्यात यावीत अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा स्वराज्य पक्षातर्फे देण्यात आला आहे यावेळी स्वराज्य पक्षाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य महेश गोरे तालुकाध्यक्ष प्रशांत थोरात, ओमकार चौगुले, महादेव धारोळे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close