ईतर

कास्ती खुर्द येथे ७३ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन

लोहारा (जि. धाराशिव): आमदार ज्ञानराज चौगले यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील कास्ती खुर्द ग्रामपंचायतीसाठी मंजूर असलेल्या सुमारे ७३ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण गुरुवारी २८ स्पटेंबर रोजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, कास्ती खुर्दचे सरपंच सागर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे योजनेंतर्गत कास्ती खुर्द येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता कामासाठी दहा लाख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून मागासवर्गीय वस्तीत रस्त्यासाठाी दहा लाख, आमदार निधीतून देवी मंदिरासमोर सभामंडप बांधकामासाठी पाच लाख, जनसुविधा योजनेतून गुरुनाथ वकील घर ते शामराव मुळे घर रस्त्यासाठी दहा लाख, स्मशानभूमी बांधकामासाठी १८ लाख, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या व तांडा वस्तींमध्ये अंतर्गत रस्ते व गटार करण्यासाई २० लाख असे एकूण ७३ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी काही कामे पूर्ण झाली आहेत. पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण व उर्वरित कामांचे भूमिपूजन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते झाले. यावेळी उपतालुका प्रमुख परवेज तांबोळी, युवा सेना तालुकाप्रमुख दत्ता मोरे, उपसरपंच इंद्रजीत लोभे, सोसायटीचे चेअरमन बालाजी पाटील, साहेबराव कदम, हरिदास भंडारे, दशरथ साळुंके, विनोद भंडारे, गुरूनाथ वकील, केशव सगट, अरुण जगताप, वीरभद्र पाटील, बाळासाहेब वाघ, दत्ता गुरव, शेषेराव थोरात, श्रीशैल्य पाटील, साहेबराव कदम, राजेंद्र हिंगमिरे, अण्णाराव भुजबळ, शिवराज लद्दे, सदाशिव हुलसुरे, हरिभाऊ मगर, सूर्यकांत कदम, तिम्मा माने, गणेश हजारे, धनराज हजारे, कुमार कदम, राजू शेख, सचिन बारगळ, पांडुरंग गुंड, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close