माझी शाळा सुंदर शाळा अभियानात बेलवाडी जिल्हा परिषद शाळा तालुक्यात प्रथम

लोहारा (जि. धाराशिव): राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्यात आले अभियानाचा निकाल जाहीर झाला असून लोहारा तालुक्यामधून बेलवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या तसेच सर्व माध्यमाच्या शाळातील शिक्षक पालक विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थ्यांमध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आनंदही असेच प्रेरणादायी वातावरण मिळावी याकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियान हाती घेण्यात आले. या अभियानाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात लोहारा तालुक्यातील शासकीय गटामध्ये तालुक्यामधील बेलवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा प्रथम क्रमांक मिळविला आहे. ही शाळा तालुक्यातील इतर शाळा साठी आदर्श ठरले आहे. विस्ताराधिकारी सुभाष चव्हाण, केंद्रप्रमुख मोहन शेवाळे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष लहु जाधव, सर्व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. शाळेतील शिक्षक परमेश्वर सूर्यवंशी, अनंत कानेगावकर, मोरवे खिजर, सुनंदा निर्मले, मल्लिकार्जुन कलशेट्टी या शिक्षकांनी शाळा प्रथम येण्यासाठी मेहनत घेतली.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात प्रथम क्रमांक आल्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे. आमच्या शिक्षकांनी मेहनत घेतली. त्याला बेलवाडी ग्रामस्थांनी मोलाची साथ दिल्यामुळे आमच्या शाळेला यश मिळाले.
मल्लिकार्जुन कलशेट्टी, बेलवाडी




