शैक्षणिक

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत कास्ती बुद्रुक शाळेने पटकाविले उपविजेतेपद!

लोहारा (जि. धाराशिव): लोहारा तालुक्यातील कास्ती बुद्रुक येथील जिल्हा परिष शाळेच्या संघाने जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले आहे. धाराशिव येथे जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत जिल्हाभरातील शाळांनी सहभाग घेतला होता. लोहारा तालुक्यातील कास्ती बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या फुटबॉल संघाने कडवी झुंज देत जिल्ह्यात उपविजेतेपद पटकावून कास्ती गावचे नाव उंचावले आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, गटशिक्षण कार्यालय यांच्यावतीने क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटशिक्षण कार्यालयाचे कार्यालयीन विस्ताराधिकारी भास्कर बेशकराव, लोहारा बीटचे शिक्षण विस्ताराधिकारी सुभाष चव्हाण, सरपंच आखिल तांबोळी, कास्ती केंद्राचे केंद्रप्रमुख गजानन मक्तेदार, साधन व्यक्ती अनंत लाहने, शाळेचे मुख्याध्यापक चंदनशिवे मधुकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बळिराम साबळे, सदस्य नागेश चव्हाण. सामाजिक कार्यकर्ते परवेज तांबोळी यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कर्णधार किरण घोडके, अब्बास मुल्ला, धनराज बेशकराव, कुणाल राठोड, निखिल वाघमारे, विराट कदम, मुशर्रफ मुल्ला, रुद्र कदम, अभिजीत भंडारे, रोहन चव्हाण, यश भंडारे, समर्थ कोळी, अरविंद राठोड, आशुतोष शेगजी, केतन सोनटक्के, प्रवीण अगंबरे, नितीन कदम, नितीन वाघमारे, व्यंकट पोतदार यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुकास्तरीय स्पर्धेत ४०० मीटर धावणे प्रकारात प्रथम क्रमांक मिळवलेल्या वर्षा राठोड, २०० मीटर धावणे प्रकारात कल्लेश्वर जगदाळे तृतीय क्रमांक तर योगा स्पर्धेत द्वितीय क्रमांक आलेला मोतीराम राठोड, १०० रिले प्रकारात प्रथम क्रमांक मिळवलेल्या वर्षा राठोड, श्रावणी समदाळे, प्रतीक्षा बेशकराव, वैष्णवी दंडगुले, श्रद्धा चव्हाण, वैभवी रवळे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अकबर मुल्ला, देवीदास बेशकराव, बाळू भंडारे, लहू भंडारे, सिद्धेश्वर घोडके, तायाप्पा चव्हाण, मकसूद मुल्ला, विजय भालेराव, मंदोदरी कोळी उपस्थित होते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मधुकर चंदनशिवे, केंद्रप्रमुख गजानन मक्तेदार, शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण, कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर बेशकराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वाघमारे यांनी केले. एस. एम. शेख यांनी आभार मानले. यावेळी शाळेतील शिक्षक एकनाथ कदम, बालाजी सोमवंशी, शिवाजी पोतदार, श्रीमती वाघमारे यांच्यासह पालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close