सामाजिक

होळी येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी

लोहारा (जि. धाराशिव): तालुक्यातील होळी येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पारंपरिक वाद्य हालगी पथकाच्या कडकडाट भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी सकाळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी युवराज कोकाटे होते. उद्घाटक म्हणून युवक काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक महेश देशमुख उपस्थित होेते.

यावेळी विचारवंत लेखक समाजिक कार्यकर्ते अॅड. शीतल चव्हाण, शिवशक्ती, भिमशक्ती, लहूशक्तीचे नेते अशोकराजे सरवदे, माजी समाजकल्याण सभापती हरीश डावरे, एस. के. चेले, कॉंग्रेसचे उमरगा तालुका अध्यक्ष अॅड. सुभाष राजोळे, संजय सरवदे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, वंचित बहजन आघाडीचे राम गायकवाड, नेताजी गायकवाड, धिरज बेळंबकर, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर भाऊ बनसोडे, मराठवाडा उपाध्यक्ष राजाभाऊ शिंदे, डॉ. चंद्रशेखर गायकवाड होळीच्या सरपंच सरोजा बिराजदार, माजी सरपंच लक्ष्मण राठोड, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष रामभाऊ जाधव, संजय बिराजदार, मारुती जाधव, स्वागतअध्यक्ष बालाजी सरवदे, दौंडचे ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचलन व आभार केशव सरवदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष ईदूकर शिंदे, अॅड. सुखदेव होळीकर, प्रताप होळीकर, कृष्णा सरवदे, मारुती शिंदे, संदीप पाटोळे यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close