माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांचा लोहारा तालुका भाजपाच्या वतीने सत्कार

लोहारा (जि. धाराशिव): भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवी कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विधान परिषदेतील “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार देण्यात आला. त्याबद्दल परंडा येथील भाजप कार्यालयात सोमवारी (दि.७) लोहारा तालुका भाजपच्या वतीने माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील (अचलेर), भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष इक्बाल मुल्ला (लोहारा), भाजपा उपतालुकाध्यक्ष बालासिंग बायस (अचलेर), भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड.जहीर चौधरी, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी चव्हाण (जेवळी), राजेंद्र सोलकंर, हिमालय वाघमारे, अदी उपस्थित होते.

