सर्वोदयी जयवंत मटकर स्मृती पुरस्काराने अब्बास शेख सन्मानित

लोहारा (जि. धाराशिव): जवाहर महाविद्याल अणदूर, महाराष्ट्र सर्वोदय मंडळ सेवाग्रम, वर्धा यांच्या वतीने देण्यात येणारा पहिला सर्वोदयी स्व. जयवंत स्मृती पुरस्कार अब्बास शेख यांना देऊ गौरविण्यात आले. अणदूर येथील जवाहर महाविद्यालयाच्या सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय मंडळाचे प्रदेशाध्यक्ष रमेश दाणे होते. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे, डॉ. सोमनाथ रोडे, डॉ. श्रीराम जाधव, चंद्रकांत चौधरी, प्राचार्य उमाकांत चनशेट्टी, नरेश बदनुरे, संजय बहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अब्बास शेख यांना सर्वोदयी स्व.वजयवंत मटकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख २१ हजार रूपये, प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. अब्बास शेख हे गेली अनेक वर्षांपासून लोहारा (जि. धाराशिव) येथील खादी ग्रामउद्योग केंद्रात कार्यरत आहेत. खादी उद्योगाला चालना देण्यासाठी रचनात्मक काम अविरतरणे सुरू आहे. या कामासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेऊन निष्ठेने काम करीत आहेत. या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र सर्वोदय मंडळ सेवाग्राम वर्धा यांनी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवचरण ठाकूर यांनी केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रकांत पाटील, रोजगार हमी योजनेचे माजी अध्यक्ष आयुब शेख, राष्ट्रवादीचे शब्बीर गवंडी, अब्दुल अजीज सय्यद, नगरसेवक अमीन सुंबेकर, नय्युम सवार, माजी नगरसेवक अभिमान खराडे, गोपाळ सुतार, सुनील देशमाने, उमाकांत माळवदकर, हुसेन शेख, विक्रांत संगशेट्टी, दगडू तिगाडे, विजय महानूर याच्यासह नागरिक उपस्थित होते.

