राज्य

जेवळीत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून आदोलन

लोहारा (जि. धाराशिव): १२ व्या शतकाता समतेचा आणि समानतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेत वादग्रस्त व आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. आमदार आव्हाड यांच्याविरोधात लिंगायत समाज आक्रमक झाला आहे. रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी जाहीर निषेध, आदोलन करीत आहेत. महात्मा बसवेश्वर हे लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करून समाजमन कुलषित करण्याच काम आमदार आव्हाड करीत असल्याचा आरोप करीत लोहारा तालुक्यातील जेवळी येथे बुधवारी (१८ ऑक्टोबर) स्मृती चौकात ग्रामस्थ व समाज बांधवांनी आमदार आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारण्यात आले त्यानंतर पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदविला आहे. दरम्यान, महात्मा बसवेश्वरांचे अभ्यासक शिक्षक रामकृष्ण पाटील यांनी बसवेश्वराचे चरित्राची ओळख करून दिली. यावेळी नागेश पणुरे, वैजिनाथ सोळशे, अमर पणुरे, श्रीशैल्य बिराजदार, अशोक भुसणे, पंडित पाटील, सुभाष हावळे, जगन्नाथ ढोबळे, धनराज बिराजदार, शंकर हावळे, भिमा मिलगिरे कल्लाप्पा हावळे, सुरेश दंडगुले, संतोष हावळे, बाळाप्पा चौधरी, बुद्धिवंत साखरे, मल्लिनाथ कारभारी, रोहित कारभारी, नितीन लिबाळे, प्रथमेश पाटील, बसवराज हावळे, मंगेश होणाजे, सुनील चवले , अमोल बिराजदार, राजशेखर वलदोडे, सूर्यकांत पणुरे, फुलचंद कारभारी, जगन्नाथ हावळे, सुभाष सारणे, नागेश होणाजे , प्रकाश ढोबळे, नागेश वलदोडे आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close