ईतर
जरांगे यांच्या स्वागत सभेसाठी लोहारा शहरात बैठक

लोहारा (जि. धाराशिव): मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे-पाटील यांची लोहारा तालुक्यातील माकणी-करजगाव येथे ११ डिसेंबर रोजी विराट जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जंगी सभा यशस्वी व्हावी, यासाठी मराठा समाजबांध एकवटला आहे. जरांगे यांच्या स्वागत सभेच्या पूर्वतयारीसाठी आज लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पाटील व्यापारी संकुलमध्ये सकल मराठा समाजबांधवांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये अकरा सदस्यीय समितीची स्थापन करण्यात आली असून या समितीमार्फत सभेची पूर्वतयारी व नियोजन करण्यात आले आहे. बैठकीनंतर समिती सदस्यांनी सभास्थळाची पाहणी करून पुढील आखणीस सुरवात केली आहे. यावेळी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव उपस्थित होता.





