जेवळी बसवरत्न पुरस्कार 2025 चे मानांकन जाहीर

लोहारा (जि. धाराशिव): तालुक्यातील जेवळी येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वर यांच्या यात्रेनिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही बसवरत्न पुरस्कार 2025 चे मानांकन जाहीर करण्यात आले आहे. 27 एप्रिल ते 2 मे 2025 या कालावधीत बसवेश्वर यात्रा पार पडत असून, 2 मे रोजी पुरस्कार वितरणाचा भव्य सोहळा होणार आहे.
महात्मा बसवेश्वर यांच्या मानवता धर्माच्या विचारसरणीशी सुसंगत राहून विविध क्षेत्रात उल्लेखनीय व आदर्शवत कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान करण्याची परंपरा श्री बसवेश्वर यात्रा कमिटीने सुरू केली आहे. समाजातील सर्व स्तरांतील गुणवंतांना एकत्र आणून नवतरुणांसाठी प्रेरणास्थान निर्माण करणे, हा या पुरस्काराचे मुख्य उद्दिष्ट आहे.
मान्यवरांचा सन्मान जेवळी येथील सांस्कृतिक सभा मंडपामध्ये शुक्रवारी 2 मे 2025 पुरस्कार वितरण म. नि. प्र. गुरू गंगाधर महास्वामीजी यांच्या हस्ते होणार आहे. सोहळ्यात गुणवंत व्यक्तींना पुरस्कार, सन्मानपत्र व विशेष गौरवचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. गावाच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात नवसंजीवनी फुंकणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, बसवेश्वर यात्रा कमिटीने घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र स्वागत होत आहे.
असे आहेत पुरस्कारप्राप्त मानकरी….
उत्कृष्ट पोलिस अधिकारी : श्री. दत्तात्रय मडोळे (पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीसाठी)
संशोधन क्षेत्र – श्री. महेश ढोबळे, कुमारी सिद्धी अपारी धरणे
युवा उद्योजक – श्री. धनराज शिंदखेडे , श्री. महादेव शिंदखेडे
सामाजिक कार्य – श्री. निळकंठ माणिकशेट्टी
शिक्षण क्षेत्रातील आदर्श शिक्षक – श्री. आर. व्ही. पाटील
युवक प्रेरणादायी व्यक्तिमत्व – श्री. अविनाश दांडेकर (नळदुर्ग पोलिस स्टेशन)
साहित्य क्षेत्र – श्री. रामचंद्र सुमन सुभाष साळुंखे (डोंबिवली – जेवळी)
युवा शेतकरी व अभियंता – श्री. अभिजीत विनायकराव पाटील





