ईतरराज्य

परिस्थिशी झुंज देत सुषमा झाली पोलिस

माकणी येथे झाला सत्कार

लोहारा (जि. धाराशिव): तालुक्यातील माकणी येथील कु. सुषमा नेताजी कांबळे हीची पिपरी चिंचवड येथे पोलिस पदावर निवड झाली. तिच्या निवडीबद्दल ग्रामस्थांच्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. सुषमाच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आई-वडील शेतात मोलमजुरी करून उदर्निवार्ह चालवतात. सुषमाने पोलिस व्हावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. परंतु, तिच्या वडीलांचे निधन झाले. डोक्यावरील छत्र हरवले असतानाही न डगमगता सुषमाने पोलिस भरतीचा सराव सुरूच ठेवला. मोठ्या जिद्दीने व कष्टाने अखेर पोलिस दलात दाखल झाली आणि तिने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. तीला पुणे येथील बार्टी या संस्थेने पूर्वतयारी, शिष्यवृत्ती, पुस्तके व आर्थिक सहकार्य करीत मार्गदर्शन केले. यात तीची मोठी बहिण पूजा हिने मोलाची साथ देत सुषमाचे मनोबल वाढविले. तिच्या निवडीबद्दल गावकऱ्यांच्या, समाजाच्या वतीने फेटा, शाल, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देऊन येथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. किशोर कांबळे, किशोर गायकवाड, रोहित गायकवाड, आकाश कांबळे, अविनाश कांबळे, धनंजय जाधव, राज्यपाल वाघमारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close