पंडितराव मोहिते यांची कृषी बँक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध

मुरूम (जि. धाराशिव): येथील उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक पंडितराव मोहिते यांची जिल्हा कृषी बँक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. निवडीबद्दल सहकारी सोसायटीच्या वतीने जिल्हा बँकेच्या प्रांगणात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील यांच्या हस्ते पंडितराव मोहिते यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दत्ता चटगे, सुधाकर पाटील, गोविंद पाटील, रशीद शेख, मल्लप्पा भोसगे, सुरेश मंगरुळे, महालिंग बाबशेट्टी, देवेंद्र कंटेकुरे, राहुल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वाढदिवसानिमित्त डॉ.नितीन डागा यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी महादेव गायकवाड, प्रमोद गायकवाड, ज्ञानेश्वर वाघमारे, शहाजी बिराजदार सह, सहकारी सोसायटी, जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मोहिते यांचा सत्कार करून अभिनंदन केले. सूत्रसंचलन उल्हास घुरघुरे, प्रास्ताविक एम. एम. जाधव यांनी केले. आभार दत्ता चटगे यांनी मानले. कार्यक्रमासाठी पी. एस. मुळे, श्यामकांत माने, मल्लिनाथ गुंडगोळे, अण्णप्पा ढंगे, राहुल मुदकण्णा यांनी पुढाकार घेतला.





