शैक्षणिक

नीट परीक्षेत यश मिळविल्याबद्दल तहेजीब शेख हीचा सत्कार

मुरुम (जि. धाराशिव): उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील तहेजीब रहीम शेख या विद्यार्थिनीने पदवी पूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये (नीट) ७०० पैकी ६२५ गुण प्राप्त करून उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल लातूर येथील बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड यांच्या हस्ते तहेजीब शेख हिचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तहेजीब शेख यांनी सांगितले की, नीट परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात ४३७ गुण मिळाले होते. मात्र, मी नाराज न होता, पुन्हा जिद्दीने प्रयत्न करून परीक्षेत चांगले यश मिळवता येईल, या आत्मविश्वासाने मी नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास केला. त्यामुळेच मला अपेक्षित यश संपादित करता आले. माझ्या या यशामध्ये तळमळीने मार्गदर्शन करणारे शिक्षक, मला प्रेरणा देणारे माझ्या कुटुंबातील सर्व नातेवाईकांचा यात महत्त्वपूर्ण वाटा आहे. विद्यार्थ्यांना मला सांगावयाचे आहे की, जेव्हा आपण शिक्षण घेतो, तेव्हा आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात विशेषतः आपल्याला पुढे जाऊन काय करावयाचे आहे याबाबत आपले निश्चित ध्येय हवे. ध्येय प्रत्यक्षात साकार करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम करावयास हवेत, तरच आपले अपेक्षित ध्येय साध्य होऊ शकते. मी गरीब आहे, खेडवळ आहे, अशी मनात न्यूनगंडांची भावना न बाळगता आहे त्या परिस्थितीवर मात करून आपण आपल्या जीवनाच्या प्रगतीची वाट चोखाळली पाहिजे, असे तीने स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close