राज्य

कानेगावचे सरपंच नामदेव लोभे अपात्र: ग्रामसभा, मासिक सभा न घेणे भोवले

लोहारा (जि. धाराशिव): ग्रामसभा व मासिक सभा न घेतल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी घेतलेल्या फेर सुणावणीमध्ये तालुक्यातील कानेगाव ग्रामपंचायतचे सरपंच नामदेव साहेबराव लोभे यांना अपात्र ठरविले आहे. कानेगाव येथील अमोल पाटील, लिंबराज पाटील, बळवंत जगताप, पांडूरंग कदम यांनी ३ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे सरपंच नामदेव लोभे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम सात अन्वये त्यांनी वित्तीय वर्षामध्ये एकूण चार ग्रामसभा घेणे त्यांच्यावरती बंधनकारक असताना ते बंधन न पाळल्याने त्यांना अपात्र करण्याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी याप्रकरणात सहा वेळा सुणावणी घेऊन सरपंच लोभे यांना अपात्र ठरविले होते. दरम्यान, सरपंच लोभे यांनी जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांच्या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. यावेळी औरंगाबाद खंडपीठाने १२ डिसेंबर २०२३ मध्ये सुनावणी घेत जिल्हाधिकारी यांचा अपात्रतेचा निर्णय रद्द करून फेर सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी मगळवारी (ता. २) याप्रकरणाची फेर सुनावणी घेतली. यात उपब्ध पुरावे पहाता सरपंच लो़भे यांनी मासिक सभा, ग्रामसभा घेली नसल्याचे सिध्द झाले. त्यामुळे त्यांना सरपंच महणून चालू राहण्यास किंवा ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या उरलेल्या कालावधीसाठी सरपंच म्हणून निवडला जाण्यास अपात्र करण्याचा निर्णय दिला आहे. फिर्यादीकडून अॅड. डी. जे. घोडके यांनी युक्तीवाद केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close