राज्य

मराठा आरक्षणासाठी लोहारा तालुका कडकडीत बंद

लोहारा (जि. धाराशिव): मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे यांच्या सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाने १४ फेब्रुवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला लोहारा शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोहारा शहरात ककडकडीत बंद पाळण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य शासनाने जारी केलेल्या मसुद्याचे सगेसोयऱ्यांच्या व्याखेसह कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राज्य सरकार आरक्षणाचे कायद्यात रूपांतर करत नसल्याने सकल मराठा समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बुधवारी लोहारा तालुक्यात बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी शहरात फेरी काढून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बंद पाळण्यात आला. शहरातील बाजारपेठ बंद करण्यासाठी नगरसेवक प्रशांत काळे, युवा शिवसेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे, नाना पाटील, लक्ष्मण रसाळ, चेतन गोरे, शरद पवार यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close