ईतर
काँग्रेस प्रदेश कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी आळंगे कुटुंबाचे केले सांत्वन

आष्टाकासार (जि. धाराशिव): लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथील जयप्रकाश आळंगे यांचे नुकतेच निधन झाले आहे. माजी राज्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील यांनी आळंगे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. अॅड. विरसंगप्पा आळंगे, प्रशांत आळंगे यांना धीर दिला. यावेळी यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव दिलीप भालेराव, जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, माजी सभापती मदन पाटील, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, अप्पाराव अलीशे, अॅड. सयाजी शिंदे, स्वामी गुरुजी ,सिद्राम तडकले ,विलास सोमवंशी, वसंत सुलतानपुरे ,भालचंद्र लोखंडे , गोसावी गुरुजी, विष्णू सगर गुरुजी शिवमूर्ती फुंडीपल्ले, गंगाधर बलसुरे आदी उपस्थित होते.





