लोहाऱ्यात धम्मचक्र प्रवर्तनदिन उत्साहात साजरा

लोहारा (जि. धाराशिव): लोहारा शहरात ६७ वा धम्मचक्र अनुप्रवर्तनदिन उत्साहास साजरा करण्यात आला. यावेळी तथागत महात्मा गौतम बुध्द, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी (ता. २४) सकाळी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कांबळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बुध्द वंदना, त्रिसरण, पंचशीलाचे पठण करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक मुळे, प्रा. बाबा गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष पोलिस पाटील तानाजी माटे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे, बाळू शिंदे, मिलिंद नागवंशी, कल्याण कांबळे, तात्याराव कांबळे, यशपाल वाघमारे, अतुल कांबळे, बंडू वैरागकर, राजू कोराळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. दरम्यान, शहरातील भीमनगर येथे वैशाली महिला मंडळाच्या वतीने बुध्द, भीम गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सुनीता कांबळे, जयश्री कांबळे, अनिता कांबळे, सुवर्णा कांबळे, अनुसया शिंदे, नंदा कांबळे, सोनाली कांबळे, सुरेखा कांबळे, पौर्णिमा कांबळे, श्वेता कांबळे, विशाखा कांबळे आदी उपस्थित होते.





