राजकिय

दीपक मुळे यांची काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड: माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी दिले नियुक्तीपत्र

लोहारा (जि. धाराशिव): लोहारा शहरातील नगरसेवक दीपक कोंडप्पा मुळे यांची धाराशिव जिल्हा काँग्रेस कमटीच्या उपाध्यपदी निवड झाली आहे. धाराशिव येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये माजी राज्यमंत्री तथा काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटी यांच्या हस्ते दीपक मुळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव दिलीप भालेराव, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आष्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपक मुळे हे तरूण असतानापासून सक्रिय राजकारणात आहेत. शिवसेनेत असताना त्यांनी तरूण कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली. तत्कालीन लोहारा ग्रामपंचायतचे सदस्य होते. नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी नगरपंचायत निवडणुकीत पत्नी ज्योती मुळे यांना निवडून आणत नगराध्यक्षपदी विराजमान केले. परंतु त्यानंत शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यामध्ये बेबनाव निर्माण झाल्याने दीपक मुळे यांनी शिसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मागील तीन-चार वर्षांपासून शहर परिसरात काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी दीपक मुळे यांनी ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते यांना सोबत घेऊन प्रयत्नशील आहेत. काँग्रेस पक्ष वाढीची तळमळ आणि जनसंपर्क पाहून दीपक मुळे यांची काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. धाराशिव येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लोहारा काँग्रेसचे शहराध्यक्ष अयनोद्दीन सवार, माजी शहराध्यक्ष के. डी. पाटील, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा सचिव रौफ बागवान, युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, नगसेवक प्रशांत काळे, बापू जट्टे, ओम पाटील, संतोष फावडे, सिराज सिद्दकी, अंकुश नारायणकर, अमित विरोधे, आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close