ईतर

पदयात्रा, रक्तदान, आरोग्य शिबीर, वृक्षलागवड उपक्रमाने मराठवाडा मुक्ती संग्रामदिन साजरा

लोहारा (जि. धाराशिव): मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव तालुक्यात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. दरम्यान, तालुका प्रशासनाच्या वतीने लोहारा ते हिप्परगा रवादरम्यान पदयात्रा काढून हिप्परगा येथील हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून शहिदांना अभिवादन करण्यत आले.
तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे मराठवाडा मुक्तीसंग्रामात शहीद झालेल्या जवानांचे हुतात्मा स्मारक आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने तालुका प्रशासनाने पदयात्रा काढून स्मारकास अभिवादन करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार रविवारी तहसील कार्यालयातील ध्वजवंदनाचा मुख्य सोहळा पार पडल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता तहसील कार्यालय ते हिप्परगा (रवा) दरम्यान पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रा अकरा वाजता हुतात्मा स्मारका जवळ पोचली. त्यानंतर तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी शीतल खिंडे, नायब तहसीलदार सुजाता हंकारे, महादेव जाधव, महसूल साहयक भागवत गायकवाड, कृषी साहयक शैलेश जट्टे, अशोक शिंदे, वजीर मनियार, भास्कर बेशकराव, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र माळी, प्रवीण गडदे, भिमाशंकर डोकडे, मारुती बनशेट्टी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी पदयात्रेत सहभागी झाले होते.
हिप्परगा रवा येथे वृक्षारोपण, रक्तदान शिबीर….
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हिप्परगा रवा ग्रामपंचायतच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात वृक्षारोपण, सर्वरोग निदान शिबीर, रक्तदान शिबीर घेण्यात आले. ग्रामपंचायत कार्यलयात सकाळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर स्मृती स्तंभाचे पूजन करून शहीदांना सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर गावच्या परिसरात विविध जातींच्या झाडांची लागवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने रक्तदान शिबिर व आरोग्य शिबीर घेण्यात आले. रक्तदान शिबिरात ५१जणांनी रक्तदान करून कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी सरपंच अभिमान कांबळे, उपसरपंच विजयकुमार लोमटे, इंद्रजित लोमटे, धर्मवीर जाधव उपस्थित होते. तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, नायब तहसीलदार सुजाता हंकारे, गटविकास अधिकारी शीतल खिंडे, पोलिस निरीकक्षक अजित चिंतले यांनी शिबिरास भेट दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close