राजकिय

ऑक्‍टोबरमध्ये पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचा फड रंगणार!


नवीदिल्ली: देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मुदत संपत येत आहे. वेळापत्रकानुसार चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत. त्या राज्यांचे निवडणूक आयोगाचे दौरे ऑक्‍टोबरच्या सुरूवातीला पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर म्हणजे ऑक्‍टोबरच्या मध्यापर्यंत संबंधित निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्‍यता आहे. देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, मिझोरम आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि मिझोरमचे दौरे केले आहेत. त्या दौऱ्यांवेळी तेथील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. आता आयोग राजस्थान आणि तेलंगणाचे दौरे करेल. त्या दौऱ्यांनंतर आयोगाकडून निवडणुकांच्या प्रत्यक्ष घोषणा केली जाईल. मिझोरम विधानसभेची मुदत १७ डिसेंबरला समाप्त होईल.

उर्वरित राज्यांमधील विधानसभांचा कार्यकाळ पुढील वर्षाच्या जानेवारीत संपेल. पुढील लोकसभा निवडणूक सात महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या राजकीय महासंग्रामाआधीची सेमी फायनल म्हणून पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांकडे पाहिले जात आहे. त्यामुळे त्यांचे राजकीय महत्व वाढले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close