धाराशिव जिल्ह्यातील १२ शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड: गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी योगदानाची दखल
लोहारा (जि. धाराशिव): शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी दिला जाणारा जिल्हा शिक्षक पुरस्कार यावर्षी १२ गुणवंत शिक्षकांना जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत प्राप्त झालेल्या शिफारशीच्या आधारे, प्राथमिक व माध्यमिक अशा दोन्ही स्तरांवर काम करणाऱ्या शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कारासाठी निवड प्रक्रियेचा आधार शासनाने १२ डिसेंबर २००० रोजी घेतलेल्या निर्णयावर आधारित असून, त्यात शिक्षकांच्या अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांशी असलेली बांधिलकी, उपक्रमशीलता, शाळेतील अभिलेख व्यवस्थापन, नावीन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी, तसेच शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीतील सहभाग आदी निकषांचा समावेश असतो.
प्राथमिक शिक्षकांची निवड:
माळी श्रीराम विठठल, जि.प. प्रा. शा. ताकविकी (धाराशिव)
मुलानी अमित जहीरुददीन, जि.प. प्रा. शा. बारुळ (तुळजापूर)
पटने लक्ष्मीकांत विठठलराव जि.प. प्रा. शा. कंटेकूर (उमरगा)
निर्मळे सुनंदा मधुकर जि.प.प्रा. शा. बेलवाडी (लोहारा)
शिनगारे सुवर्णा मधुकर जि.प.प्रा.शा. शेलगाव ज. (कळंब)
मदने मुकुंद विष्णू जि.प.प्रा.शा. गोलेगाव (वाशी)
तोडकरी संतोष दादाराव जि..प. प्रा. शा. गणेगाव (भूम)
खराडे प्रदिप अनिरुध्द जि.प.प्रा.शा. टाकळी (परंडा)
बागवान बेबी तब्बसूम जि.प. प्रशाला ढोकी (धाराशिव)
सोनावणे दिपक ज्ञानेश्वर जि.प. प्रशाला तुळजापूर
सावंत शंकर ज्ञानेश्वर, जि.प. प्रशाला दहिफळ (तुळजापूर)
या निवडीसाठी सर्व शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वेळेत सादर केले होते. त्यावर प्राथमिक शिफारसी करताना, संबंधित शिक्षकांनी घेतलेली शैक्षणिक सुधारणा, समाजात केलेली जनजागृती, तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय उपक्रमात घेतलेला सहभाग यासह अनेक पैलूंची तपासणी करण्यात आली होती.

