ईतर

राष्ट्रवादी काँग्रेसचे शब्बीर गवंडी यांच्या मुलीचा विवाह थाटात संपन्न; आमदार चौगुले यांची उपस्थिती

लोहारा (जि. धाराशिव): शहरातील कन्या शाळेत रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी यांच्या मुलीचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या विवाह सोहळ्यास उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहून नव वधु वरांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अशोकभाऊ जवळगे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गुंडूण्णा भुजबळ, शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील सूर्यवंशी, उमरगा बाजार समिती माजी सभापती सुलतान शेठ, शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष नरदेव कदम, ज्येष्ठ नेते नागणा वकील, चंद्रकांत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख सलीम शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अशद पठाण, अॅड‌‌. समद पटेल, उपनगराध्यक्ष आयुब शेख, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, डॉ. हेमंत श्रीगिरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती व्यंकट कोरे, काँग्रेपक्षाचे जिल्हा सरचिटणीस शामसुंदर तोरकडे, नगरसेवक अविनाश माळी, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, नगरसेवक अमीन सुंबेकर, नगरसेवक दीपक मुळे, नगरसेवक जालिंदर कोकणे, बालाजी मक्तेदार, भाजपचे तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इक्बाल मुल्ला यांच्यासह विविध पक्षातील नेते, डॉक्टर, पत्रकार, अधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत महेबूब गवंडी, मुबारक गवंडी, शहेबाज गवंडी, अरबाज गवंडी, जब्बार गवंडी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close